अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान
एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान ॥धृ॥
दिव्य तुझी रामभक्ति, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तु सुर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
एक मुखाने बोला ॥1॥
लक्ष्मणा आली मुर्छा लागुनीया बाण
द्रोणागिरी साठी राया, केले तु उड्डाण
तळहातावर आला, घेऊनी पंंचप्राण
एक मुखाने बोला ॥2॥
सितामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे, परि हसले विभिषण
एक मुखाने बोला ॥3॥
धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे, उपासीका देवा
घे बोलावूनी आता, कंठासी आले प्राण
एक मुखाने बोला ॥4॥
